सरकारी कर्मचाऱ्यांचा संप येथे अजूनही सुरूच, काटकरांचा जाळला पुतळा

भंडारा : राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करावी, या मागणीसाठी १४ मार्च पासून बेमुदत आंदोलन पुकारले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत २० मार्चला  शिष्टमंडळाची चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, असा दावा कर्मचारी नेते विश्वास काटकर यांनी केला. तसे लेखी आश्वासन सरकारने दिल्याचंही काटकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्री यासंदर्भातील निवेदन विधानसभेत करतील. संप मिटल्याने उद्यापासून कर्मचारी कामावर हजर राहतील, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र त्यांच्या या निर्णयाला राज्यातील काही जिल्ह्यात विरोध होताना दिसत आहे. bhandara 2 n

 

सूत्रानुसार, भंडाऱ्यात संपकरी कर्मचाऱ्यांनी कर्मचारी नेते विश्वास काटकर यांच्या पुतळयाला जोडे मारत पुतळा जाळला आहे. काल विश्वास काटकर यांनी संप वापस घेतल्याचा निर्णय घेतला. जुनी पेंशन योजना मान्य न होता संप मागे घेणे चुकीचे आहे. त्यामुळे सुकाणु समितीच्या संप मागे घेण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही.

कर्मचारी नेते विश्वास काटकर यांनी आमच्या विश्वास घात केल्याचा आरोप भंडारा येथील कर्मचाऱ्यांनी केला. आंदोलन संपकरी कर्मचारी यांनी कर्मचारी नेते विश्वास काटकर यांच्या पुतळ्याला जोडे मारले. तसेच काटकर यांचा पुतळा जाळला आहे. जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याच्या निर्धार करण्यात आला आहे.

गोंदियात सरकारी कार्यालयात शुकशुकाट
दुसरीकडं गोंदिया जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुकाणू समितीचा निर्णय मान्य नाही. म्हणून सुकाणू समितीचा निर्णय फेटाळला. आजही जिल्हाअधिकारी कार्यलयासमोर सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले. आज संपाचा ८ वा दिवस आहे. सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने सरकारी कार्यालय शुकशुकाट पाहायला मिळत आहे. हा संप कधीपर्यंत राहणार अशी चर्चा नागरिक करत आहेत. नागरिकांची कामे खोळंबल्याने ते चांगलेच संतापले आहेत.