तरुण भारत लाईव्ह । मुंबई : सर्वोच्च न्यायालयात दिल्ली सरकारच्या निकालाचे वाचन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुरू केले आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचे वाचन सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंनी दिला नसता तर सरकार परत आणलं असतं, असे स्पष्ट पणे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानंतर अखेर राज्यातील सरकार आता स्थिर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरी देखील निकाल लागल्यानंतरही राऊत म्हणतात सरकार बेकायदेशीर आहे.
उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा आता एकनाथ शिंदेंच्या पथ्यावर पडला, असं खुद्द न्यायालयानेच आपल्या सुनावणीत स्पष्ट बोलून दाखविल्याने उद्धव ठाकरेच या सगळ्याला कारणीभूत असल्याचा निष्कर्ष यातून निघाला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरले तरी राज्यातील भाजपच्या पाठिंब्यावरील सरकार कोसळण्याची शक्यता नाही. फडणवीस-शिंदे सरकार स्थिर राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.दरम्यान सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दक्ष झाले असून ‘सामना’ कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला.