---Advertisement---

तीन महिन्यांचे धान्य ३१ मेपूर्वीच वितरित करण्याचे शासनाकडून आदेश, नेमकं कारण काय ?

---Advertisement---

जळगाव: जिल्ह्यात शिधापत्रिकाधारकांना जून ते ऑगस्ट २०२५ या तीन महिन्यांचा धान्य पुरवठा ३१ मेपूर्वीच करावा, असे आदेश शासनस्तरावरून जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात अंत्योदय, केशरी, कुटुंब प्राधान्य असे सुमारे सहा लाखांपेक्षा अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. या बीपीएल आणि अन्य गटांतील शिधापत्रिकाधारकांना आगामी मॉन्सून, तसेच नैसर्गिक आपत्ती काळात एकत्रितरीत्या तीन म हिन्यांचा अन्नधान्याचा पुरवठा वितरित करावा, असे आदेश शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. यात जून ते ऑगस्टदरम्यान दर महिन्याचे सरासरी दीड लाख क्विंटल धान्य याप्रमाणे चार लाख ५० हजार क्विंटल धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना एकत्रितपणे पुरविण्यात येणार आहे.

मॉन्सून तसेच नैसर्गिक आपत्ती काळात शिधापत्रिकाधारकांची अडचण होऊ नये, यासाठी ऑगस्ट २०२५ पर्यंतची धान्याची उचल एफसीआयकडून ३० मेपूर्वीच करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.
– रूपेश विजय बिजेवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment