सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..! तब्बल 5369 सरकारी नोकऱ्यांसाठी अधिसूचना जारी

कर्मचारी निवड आयोगाने बंपर पदासाठी भरती काढली आहे. या भरतीची विशेष गोष्ट म्हणजे 10वी, 12वी आणि पदवी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ही पदे एसएससी निवड पोस्ट फेज 11 अंतर्गत आली आहेत.

ज्या उमेदवारांना या रिक्त जागांसाठी अर्ज करायचा आहे ते एसएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023  (11:00 PM) आहे. निवड झाल्यावर, उमेदवारांना विविध सरकारी मंत्रालये, विभाग, संस्था इत्यादींमध्ये नियुक्ती मिळेल.

या पदांसाठी होणार भरती
1 सिनियर टेक्निकल असिस्टंट
2 गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर (GCI)
3 चार्जमन (IT)
4 लायब्ररी & इन्फोर्मेशन असिस्टंट
5 फर्टिलाइजर इंस्पेक्टर
6 कॅन्टीन अटेंडंट
7 हिंदी टायपिस्ट
8 इन्वेस्टिगेटर ग्रेड -II
9 लायब्ररी अटेंडंट
10 सिनियर सायंटिफिक असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2023 आहे.

जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा  – APPLY