---Advertisement---
नंदुरबार : विसरवाडी ते नंदुरबार मार्गावर फाट्याजवळ बोदवड अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भरडू (ता. नवापूर) येथील ग्रामपंचायत सदस्य जागीच ठार झाले. मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. दिनकर हेमू वसावे (४५) असे सदस्याचे नाव आहे.
दिनकर वसावे मंगळवारी दुपारी (एमएच ३९ एएम ९१६२) या दुचाकीने विसरवाडी येथून भरड्डू गावाकडे जात होते. दरम्यान, नंदुरबार ते विसरवाडी रस्त्यावर बोदवड गावाच्या वळण रस्त्यावर समोरून भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
धडकेत वसावे यांच्या डोके आणि पायाला जबर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला होता. त्यात त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र सावळे हे त्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
अपघातानंतर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. दिनकर वसावे हे भरडू (ता. नवापूर) गावाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य होते. परिसरात ते एक उत्तम क्रिकेटर म्हणूनही ओळखले जात होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
---Advertisement---