---Advertisement---

जळगावात पोलिस कुटुंबीयांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जाणून घ्या कधी आणि कुठे?

---Advertisement---

जळगाव : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगाव व अरुश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस कुटुंबीयांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि.८ मार्च रोजी सकाळी १० वाजता सुरू होऊन दुपारी २ वाजेपर्यंत नविन पोलिस वसाहत, एस.पी. ऑफिस मागे, जळगाव याठिकाणी होणार आहे.

शिबिरात बीपी, शुगर, दमा, त्वचारोग, मुलव्याध, फिशर, भगंदर, अस्थिरोग, नेत्र तपासणी, दंत रोग तपासणी, कान, नाक, घसा, न्युरो व बालरोग, मूत्ररोग व लघवीचे विकार यांसारख्या आजारांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी डॉ.परिक्षित बाविस्कर, डॉ.स्वाती बाविस्कर, डॉ.भूषण चौधरी, डॉ.मनोज पाटील, डॉ.अजय सोनवणे, डॉ. राहुल पवार, डॉ.वैशाली पुरी, डॉ.गोपाल घोलप, डॉ.सिद्धांत घोलप, डॉ.अमित भंगाळे आदी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांच्यासह किरण राजपूत, तन्वी पांडव, चेतन वाणी, राकेश कांबळे हे परिश्रम घेत आहेत. तसेच उपक्रमाला जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते भगवान सोनवणे, मुक्ती फाऊंडेशनचे मुकुंद गोसावी, हेमंत फाउंडेशन, मानवता हॉस्पिटलचे राहुल सूर्यवंशी आदींचे सहकार्य लाभत आहे.

पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक 9270041025 व 9960041025 यावर संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment