अयोध्यात अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलशाचे धडगावात भव्य शोभायात्रा

धडगाव :  येत्या 17 जानेवारी पासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार असून, 22 जानेवारीला या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने कलश यात्रेचे आयोजन राज्यभरात करण्यात येत आहे.

अयोध्या येथे अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलश आणि निमंत्रण पत्रिका यासोबतच भगवान राम यांचं प्रतिमेचं धडगाव शहरात आगमन झाले. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने धडगाव शहरातून भगवान श्रीराम यांच्या अक्षदा कलशाच शोभा यात्रा काढण्यात आली.

या शोभायात्रेचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले. या अक्षदा कलशाच 21 जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले असून 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान या अक्षदांचे घरोघरी जाऊन जिल्हाभरात वाटप करण्यात येणार आहेत. या शोभायात्रेत महिलांनी डोक्यावर अक्षदा कलश घेत जय श्री राम चा जयघोष केला होता.