लहान मुलांचा वाद अन् आजोबांचा गेला जीव, नेमकं काय घडलं…


धुळे : लहान मुलांच्या वादातून आजोबांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शिरपूर तालक्यातील जुनी सांगवी येथे घडली. यात गंभीर जखमी झालेले आजोबा भगवान लक्ष्मण गायकवाड (५६) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हल्लेखोर नागेश गावित याला ताब्यात घेतले आहे.

भगवान यांचा नातू खुशाल व नागेश गावीतचा मुलगा सौरभ यांच्यात वाद झाला. गायकवाड यांनी नागेशला भांडणाबाबत विचारणा केली असता तुला मारुन टाकीन असे सांगत नागेश तेथून निघून गेला. जुनी सांगवीतील जिल्हा परिषद शाळेजवळ गायकवाड मित्रांसमवेत बसले होते. तेथे नागेश याने शिवीगाळ करीत चाकूने गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

यात जखमी झाल्याने गायकवाड यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणि पुढे धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल होते. केले याप्रकरणी भगवान गायकवाड यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नागेश गावीत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---