आज्जींचा दमदार पराक्रम : तरुणीला जे जमलं नाही ते करून दाखवलं, व्हिडिओ व्हायरल

#image_title

सोशल मीडियावर रोजच अनोख्या आणि मनोरंजक व्हिडिओंचा खजिना उघडला जातो. अशाच एका व्हायरल व्हिडिओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ इतरांपेक्षा अगदीच वेगळा आहे आणि तो पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : 36 वर्षीय महिलेचं 15 वर्षीय मुलावर जडलं प्रेम; लग्नासाठी पळालेही, पण…

व्हिडिओत दिसतं की जिममध्ये एक मोठा टायर आणि हातोडा ठेवलेला आहे. तिथे एक तरुणी हातोड्याने टायरवर जोरदार मारण्याचा प्रयत्न करते, मात्र ती प्रयत्नांतीही अपयशी ठरते. याचवेळी, एका आज्जी मोठ्या आत्मविश्वासाने हातोडा उचलून न थकता टायरवर वार करते आणि पाहणाऱ्यांना अचंबित करते. तिचा उत्साह आणि ताकद पाहून नेटीझन्स तोंडात बोटं घालायला लागले आहेत.

हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर @supremesanghi नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत ‘बर्गर विरुद्ध भाकरी’ असा मजकूरही लिहिण्यात आला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. बातमी लिहीपर्यंत या व्हिडिओला ५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, तो सातत्याने शेअर केला जात आहे.

हेही वाचा : मुस्लिम तांत्रिक, अल्पवयीन मुलीला अर्ध्या रात्री बोलावलं अन्; गावात खळबळ 

युजरच्या भन्नाट प्रतिक्रिया 

एका युजरने लिहिलं, “आजी घरकाम करून एकदम प्रो बनल्या आहेत!”
दुसऱ्या युजरने टिप्पणी केली, “साडी विरुद्ध टाइट आउटफिट – साडी जिंकली.”
तर आणखी एका युजरने म्हटलं, “काकूंनी अक्षरशः टायर हादरवून टाकला, टायरही रडत असेल की कोणाच्या हातात सापडलो!”

आज्जींचा हा दमदार पराक्रम पाहून अनेकांनी तिच्या फिटनेस आणि जिद्दीचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी नसून, प्रेरणा देणारा ठरतो. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही तुमची ताकद आणि जिद्द दाखवू शकता, हे या आज्जींनी सप्रमाण सिद्ध केलं आहे!