तरुण भारत लाईव्ह । ९ मे २०२३। नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास उमेदवारांना एक उत्तम संधी चालून आलीय. भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
मोटार चालक सह मेकॅनिक” पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आलेली असून जर तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२३ आहे. या भरती अंतर्गत एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच हिंदी/इंग्रजीचे ज्ञान, जड आणि हलक्या दोन्ही वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : १८ ते २७ वर्षे, (SC/ST उमेदवारांसाठी १८ ते ३२ वर्षे आणि इतर मागासवर्गीयांसाठी – १८ ते ३०वर्षे (OBC) निश्चित करण्यात आली आहे.)
मिळणार पगार किती?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये पगार मिळेल
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३१ मे २०२३