तरुण भारत लाईव्ह । ३१ मार्च २०२३ । तुम्ही जर बारावी किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची एक मोठी संधी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे विविध पदांसाठीची अधिसूचना जारी झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी iums.pdkv.ac.in या लिंकवर क्लीक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2023 पर्यंत आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
किती पदे रिक्त आहेत?
या भरती अंतर्गत एकूण 16 पदे रिक्त आहेत.
कोणत्या पदांसाठी होणार आणि पात्रता काय?
1) सहाय्यक (Assistant) 01
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
2) स्टेनोग्राफर (Stenographer) 03
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.उमेदवारांना 80 w.p.m ला 10 मिनिटांसाठी इंग्रजी किंवा हिंदीमध्ये एक श्रुतलेखन चाचणी दिली जाईल. ज्या उमेदवारांनी इंग्रजीमध्ये परीक्षा दिली आहे त्यांना 50 मिनिटांत प्रकरण संगणकावर लिप्यंतरित करणे आवश्यक आहे आणि जे उमेदवार हिंदीमध्ये परीक्षा देणार आहेत त्यांनी 65 मिनिटांत संगणकावर प्रकरण लिप्यंतरण करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता : १० उत्तीर्ण, विहित सरकारी प्राधिकरणाकडून वैध आणि योग्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे (उमेदवाराला संस्था/विद्यापीठाच्या योग्य समितीने घेतलेली व्यावहारिक कौशल्य चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
4) प्रोग्राम असिस्टंट संगणक (Programme Assistant Computer) 03
शैक्षणिक पात्रता : कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पात्रता.
5) प्रोग्राम असिस्टंट (लॅब टेक्निशियन) (Programme Assistant (Lab Technician) 03
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी आणि संबंधित विषयांमध्ये बॅचलर पदवी
6) फार्म मॅनेजर (Farm Manager) 03
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी आणि संबंधित विषयांमध्ये बॅचलर पदवी
वयाची अट: 28 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्ष {SC/ST: 05 वर्ष सूट, OBC: 03 वर्ष सूट}.
तुम्हाला किती पगार मिळेल?
सहाय्यक – 35,400-1,12,400
स्टेनोग्राफर – 25,500-81,100
ड्रायव्हर-कम-मेकॅनिक – 21,700-69100
प्रोग्राम असिस्टंट (संगणक) – 35,400-1,12,400
प्रोग्राम असिस्टंट (लॅब टेक्निशियन) 35,400-1,12,400
फार्म मॅनेजर- 35,400-1,12,400
नोकरी ठिकाण: अकोला