दिलासादायक बातमी ! खाद्यतेलासह किराणा माल काही प्रमाणात स्वस्त

खाद्यतेलासह इतर वस्तूचे दरवाढ सर्वसामान्यांना सहन करावे लागत होते. मात्र, आता महाग झालेला किराणा काहीसा स्वस्त झाला असून, यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

ऐन सणासुदीत तेजीत असलेली बाजारपेठ निवडणुकीच्या काळात कमालीची मंदावली होती. त्यामुळे किराणा बाजारातदेखील मोठी उलाढाल न झाल्याने अनेक वस्तूंचे दर कमी झाले आहे.

गणेशोत्सव काळात चणाडाळ, तेल, साखर, गुळाचे दर वाढले होते. त्यानंतर पितृपंधरवड्यात शांत राहिलेल्या बाजारात नवरात्रपासून पुन्हा तेजी आली. दसरा व नंतर दिवाळीत खाद्यतेलासह किराणा दर कमालीचे वाढले होते. मात्र आता किराणा मालाच्या विविध वस्तूच्या किमतीत २ ते १० रुपयांची घसरण झालेली दिसून येत आहे.

दिवाळीत सोयाबीन तेलाचा भाव १५० रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. मात्र सध्या सोयाबीन तेलाचे दर १४० ते १४२ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. पामतेल देखील १५० रुपयांवरून १४२ ते १४४ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीन तेलाचा भाव ११० रुपयापर्यंत होता. मात्र यानंतर केंद्राने घेतलेल्या एका निर्णयामुळे भावात मोठी वाढ झालीय.

वस्तूंचे दरवाढ झाले काहीचे कमी
यात तेल, साखर, डाळ, साबुदाणा, शेंगदाणा दरात घसरण झाली असून भाव काहीसे स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना थोडा यामुळे दिलासा मिळाला आहे.