जळगाव दूध संघ निवडणूक: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विजय, सहकारात एंट्री

तरुण भारत लाईव्ह | ११ डिसेंबर २०२२ | जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. काही जागांचे निकाल लागले असून यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दूध संघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करत सहकारात दिमाखदार प्रवेश केला आहे. गुलाबराव पाटील हे २५९ इतकी मते मिळवून विजयी झाले.

ना. गुलाबराव पाटील यांची आतापर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुका लढविल्या आहे. मात्र यांनी आतापर्यंत सहकारी संस्थांची निवडणूक लढविली नाही. यंदा मात्र त्यांनी दुध संघाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. त्यांनी जळगाव सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला. त्यांच्या समोर महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन यांनी अर्ज दाखल केला होता.

भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एससी संवर्गातून तर एनटी संवर्गातून अरविंद भगवान देशमुख यांनी विजय संपादन केला आहे. दोघं विजयी उमेदवार शेतकरी विकास पॅनलचे होते. सहकार पॅनलकडून ओबीसी मतदारसंघात पराग वसंतराव मोरे यांनी ३१ मतांनी विजय मिळवला. जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया गुलाबराव देवकर या विजयी झाल्या आहेत.