---Advertisement---

Guinea Football Match : जेरेकोरमध्ये फुटबॉल मॅचदरम्यान हिंसाचारात; आतापर्यंत 56 लोकांचा मृत्यू

---Advertisement---

आफ्रिकन देश गिनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर जेरेकोर येथे फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे 56 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मॅच रेफरीने वादग्रस्त निर्णय दिला, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हाणामारी झाली. हाणामारी होत असल्याचे पाहून प्रेक्षकही मैदानात घुसले आणि हिंसाचार सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

दक्षिण गिनी सरकारने सोमवार, 2 रोजी सांगितले की, फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 56 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर डझनभर लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. देशाच्या दळणवळण मंत्र्यांनी निवेदन जारी करून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशाचे लष्करी हुकूमशहा आणि अंतरिम राष्ट्रपती मामादी डुंबोया यांच्या सन्मानार्थ आयोजित स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान हा हिंसाचारात झाला. लेबा आणि न्जेराकोर संघांमधील अंतिम सामन्यादरम्यान रेफरीच्या निर्णयावरून वाद झाला.

मॅच रेफरीने वादग्रस्त निर्णय दिला, त्यामुळे दोन्ही संघांमध्ये हाणामारी झाली. हाणामारी होत असल्याचे पाहून प्रेक्षकही मैदानात घुसले आणि हिंसाचार सुरू केला. दोन्ही बाजूंच्या चाहत्यांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली आणि त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या गोळ्याही सोडल्या, त्यानंतर गोंधळ उडाला, असा दावा वृत्तात केला जात आहे. आतापर्यंत या हिंसाचारात सुमारे 56 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment