नाशिक : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर राज्याचे राजकारण चांगलच तापलं आहे. कुणी कुणावर आरोप करतंय, तर कुणी खळबळजनक वक्तव्य करतंय, आता पुन्हा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?
‘मित्र मिळाला तर तो पहिलवान असला पाहिजे, कुपोषित बालकासोबत मैत्री करून काय फायदा? असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, आपची महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहीत आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.
नाशिकच्या मालेगाव येथील झोडगे येथे गुराबराव पाटील यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचे भूमी पूजन झाले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतना उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे.
शुक्रवारी अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर केजरीवाल यांनी सांगितले की, आम्ही देशातील परिस्थितीवर चर्चा केली. महागाई वाढत आहे, मात्र सर्वसामान्यांची कमाई वाढत नाही. केंद्र सरकार काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवर बोलताना गुलाबराव पाटलांनी ही टीका केली आहे.