Gulabrao Patil : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असे विधान ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केलं होतं. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘मी संजय राऊत यांना भाव देत नाही’, अस उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जळगाव जिल्ह्यात वाश आऊट मोहीम
एक विशिष्ट प्रकारेचे अवैध दारू ही विक्री होत असून त्यामुळे अनेकांना मृत्यू ओढावत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात वाश आऊट मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कोणत्याही पक्षाच्या लोकांनी अशा गोष्टींना आश्रय देऊ नये. मात्र विरोधकांचं काम असतं टीका टीपणी करायचं, त्यामुळे ते टीका करतात. त्यामुळे ही अवैध दारू हद्दपार कशी होईल, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
मंत्री अनिल पाटील म्हणाले
यवतमाळ महागाव येथे नदीच्या पलीकडे 40 ते 45 जण अडकल्याचे सकाळी समोर आले. अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी एसडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून दोन हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे 45 जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनास्थळी सर्व प्रशासकीय अधिकारी व दोन एसडीआरएफच्या तुकड्या दाखल झाले असून घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.