Gulabrao Patil : ‘मेरे पास ना दादा की दौलत, ना बाप की, मेरे पास आपका आशीर्वाद’

जळगाव : कोणत्याही निवडणुकीच्या विजयाची पाया भरणी करणारे बूथ प्रमुख आणि शिवदूत असतात. त्यामुळे बूथ प्रमुख आणि शिवदूत हे खरे शिवसेनेचे शिलेदार असून त्यांनी चालता, बोलता प्रचारक झाले पाहिजे. पडद्याआड राजकारण करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांपासून व सिझनेबल पुढाऱ्यापासून सावध रहा. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख आणि दु:खात मी आणि माझा परिवार आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. आता तुमची साथ हवी आहे. निवडणूक हे एकप्रकारे युद्धच असून यात कोण समोर आहे. याचा विचार न करता केवळ विजयाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवा. सर्वसामन्य कार्यकर्त्यांची शक्ती व ताकद हीच माझी दौलत असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव तालुका शिवसेनेचा बूथ प्रमुख, शिवदूत आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा जळगाव येथिल आदित्य लॉन येथे पार पडला यावेळी ते बोलत होते. ‘मेरे पास ना दादा की दौलत है और ना बाप की., मेरे पास आपका आशीर्वाद ही मेरी ताकद है ! अश्या शब्दात शेरो’ – शायरी करत पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आगामी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने प्रत्येक बूथ प्रमुखाने व कार्यकर्त्यांनी लाडकी बहिण यांच्या 10-15 घरांना भेटी देवून घरा – घरात योजनांची व आपण केलेल्या कामांची माहिती पोहचावा. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीचा 70 टक्के निकाल हा बूथ कमिटीच्या नियोजनावरच अवलंबून असतो. त्यामुळे बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवरचे अतिशय बारकाईने नियोजन करा. हा केवळ बूथ प्रमुखांचा मेळावा नाही तर विधानसभेसाठी विजयी संकल्प मेळावा आहे. सद्या सिझनेबल पुढारी हे खोटे बोल, पण रेटून बोल या पध्दतीने प्रसिध्दी करीत आहेत. अशावेळी बूथप्रमुख व कार्यकर्त्यांनी त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी व भगवा फडकविण्यासाठी सज्ज तयार असले पाहिजे असे सांगितले.

यावेळी आसोदा, देऊळवाडे, पाथरी, घार्डी येथिल असंख्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तसेच जळगाव ग्रामीण मतदार संघातील शिवसेना सदस्य नोदणीचा शुभारंभ हायटेक पद्धतीने करण्यात आला. जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिता ताई कोल्हे – माळी , माजी सभापती ललिता ताई कोळी, मुकुंदराव नन्नवरे, रमेशअप्पा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, राजेंद्र चव्हाण, देविदास कोळी, राजेश पाटील यांनी शिवसेना संघटना बांधणी व शिवसेना सदस्य नोदणी , बूथ प्रमुखांची जबाबदारी व कर्तव्य याबाबत सविस्तर माहिती दिली.

मेळाव्याचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवराज पाटील यांनी केले. विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. यावेळी आदित्य लोन परिसरात भगवामय वातावरण होते. शाहीर विनोद ढगे आनुई त्यांचे सहकारी यांनी महाराष्ट्र गीत मंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच वाजत – गाजत , फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाहीर विनोद ढगे व कलावंतानी महाराष्ट्र गीताने सुरुवात करून व पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाडयाने उपस्थीत मंत्रमुग्ध झाले होते. मेळाव्याचे उद्घाटन बूथ प्रमुख व शिवदूत आणि जेष्ठ शिवसैनिक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिता ताई कोल्हे – माळी जि. प. सदस्य पवन सोनवणे, प्रतापराव पाटील , उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, युवासेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर काटोले, अजय महाजन, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील , लाडकी बहिण योजनेचे अध्यक्ष अर्जुन पाटील,शेतकी संघाचे चेअरमन ब्रिजलाल पाटील, मुरलीधर ढेंगळे, श्याम कोगटा, मुंबईचे अजय उजंबळे, तालुका पदाधिकारी जितू पाटील, रवी कापडणे, प्रमोद सोनवणे, संदीप सुरळकर, डॉ. कमलाकर पाटील, दूध संघाचे रमेश आप्पा पाटील, महेश चौधरी, गोपाल जिभाऊ पाटील, महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या सह जळगाव तालुक्यातील बुथप्रमुख, शिवदूत, सरपंच, उपसरपंच सदस्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.