धरणगांव : महायुतीच्या जळगाव मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ पाच लाखापेक्षा अधिक मतदानाने विजयी होतील, असा आत्मविश्वास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
येथील हिरा इंटरनेशल महाविद्यालयचा भव्य पटांगणात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात श्री. पाटील बोलत होते. व्यासपीठावर चंद्रशेखर अत्तरदे, माधुरीताई अत्तरदे, डि.ओ. पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, नाटेश्वर पाटील, शाम पाटील, रेखाताई पाटील, भारती चौधरी, भानुदास विसावे, भगवान महाजन, विलास महाजन, मुकुंद नन्नवरे, भाजप शहराध्यक्ष दिलीप महाजन, टोनी महाजनसह आदि उपस्थित होते.
आपला विजय निश्चीत असला तरी आपण गाफील न रहाता तालुक्यातील जि.प.गट निहाय प्रचाराची नियोजीत यंत्रणा उभी करावी. तसेच जास्तीत जास्त मतदान कसे होईल यांची नियोजनबद्ध आखणी करून मतदानाची टक्के वारी वाढवावी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी अहोरात्र परीश्रम घ्यावे असे आवाहनही श्री पाटील यांनी केले.
लोकसभेचे उमेदवार स्मिताताई वाघ यांनी आपल्या मनोगतातुन पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या लोकाभिमुख कामाची माहिती देऊन मी देखील जि. प.अध्यक्ष व विधान परिषद सदस्य या नात्याने अनेकाचे कामे केली असुन जनता माझा पाठीशी नक्कीच उभी असा आशावाद व्यक्त करून आगामी काळात 13मे रोजी होत असलेल्या जळगांव लोकसभेचा निवडणुकीत मला विजयाची संधी उपलब्द करून द्यावी असे आवाहन केले. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, अजय भोळे, लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ, सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, राॅकाॅचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, डाॅ राधेशाम चौधरी, सुभाष पाटील, संजय पाटील, जेष्ठ नेते डि.जी.पाटील, पी.सी.पाटील, राॅकाॅ नेते ज्ञानेश्वर महाजन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन, उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील आदिनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार कैलास माळी यांनी केले प्रसंगी शहर व तालुका परीसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.