---Advertisement---
भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ हे फक्त रेल्वे जंक्शन नाही, तर शिवसेनेच्या जनादराचे जंक्शन आहे. १९९१ पासून हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून आता पुन्हा भुसावळ नगरपालिकेवर भगवा फडकविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
ते संतोषी माता हॉल येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युतीचा विचार केला जाईल, अन्यथा स्वबळावर लढण्यास सज्ज राहा. प्रत्येक बुथ मजबूत करा, कारण बुथच विजयाचा पाया आहे.” त्यांनी भुसावळ शहरासाठी ४९ कोटी रस्ते विकासासाठी, १३६ कोटी पाणीपुरवठ्यासाठी आणि ८५ कोटी विविध योजनांसाठी असा एकूण २७० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, भुसावळ नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा. शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी असलेली संघटना आहे.
जळगाव विभाग जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, स्थानिक जिल्हाप्रमुख समाधान महाजन, महिला जिल्हाप्रमुख नंदाताई निकम, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पवन भोळे, विलास मुळे, संतोष माळी, पवन नाले, वर्षा तल्लारे, दीपाली बऱ्हाटे, श्रद्धा गायकवाड, जितेंद्र नागपुरे, दुर्गेश बेदरकर, गणेश सोनवणे, सैयद जाफर अली यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक माजी नगरसेवक दिपक धांडे यांनी केले.
शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
या मेळाव्याचा आणखी एक ठळक भाग म्हणजे विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.यामध्ये माजी नगराध्यक्षा माधुरी पालक, माजी नगरसेवक अमोल इंगळे, मनसेचे शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, उपजिल्हा प्रमुख कैलास लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा नेमाडे, तसेच मंगेश भावे, सुजित शिंदे, गोपाळ कोळी, चेतन राजपूत, शुभम सैनिक, दुर्गेश सहानी, लोकेश ठाकूर, नोशांक चौधरी, शिवम गायकवाड, सचिन राऊत, हितेश तायडे, गणेश पाटील सर, मयूर बऱ्हाटे, राहुल पवार, निळकंठ पवार, विजय रायपुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.









