जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर ना. गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता, ‘याबाबत संजय राऊतांना विचारा, तुम्हाला तो महारथी सांगेल’, असे म्हणत ना. पाटलांनी राऊत यांना इडीमध्ये काय झालं, हे आमच्या लक्षात आलं आहे. त्यांनी आपला आजार बघावा, असा सल्लाही राऊतांना दिला.
ठाकरे आमदार शिवसेनेत येण्याची चर्चा
38 वर्ष ज्यांना पक्षात झाले असे सुधाकर बडगुजर हे जुने कार्यकर्ते नाराजीमुळे पक्ष सोडण्याची भूमिका घेत आहेत.
गुलाबराव पाटलांनी जे केलं ते उठाव होता किंवा गद्दारी होती, मग आता हे लोक काय करत आहेत ?
या लोकांना का प्रेम कमी पडत आहे ? अजूनही संजय राऊत यांची रग गेलेली नाही. संजय राऊत सारखा भूत जिथपर्यंत आहे ते किती लोकांचा बळी घेईल, हे सांगता येत नाही, अशी टीका ना. पाटील यांनी केली.
सुधाकर बडगुजर नाराज
फक्त संजय राऊत पक्षात राहतील. शिवसेना ठाकरे गट शिल्लक राहणार नाही . ठाकरे गट हा बाळासाहेबांच्या नावाने असल्याने शिल्लक राहणार नाही, असा आम्ही म्हणत नाही . शिल्लक राहूच नये ही भूमिका आमची नव्हे ही भूमिका संजय राऊत यांची आहे. संजय राऊत यांनी बेना घेतला आहे. संजय राऊत काय करेल हे सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.
आगामी निवडणूक महायुती
आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत व तो प्रयत्न करण्याची गरज आहे. महायुती झाली तर विरोधकांकडे उमेदवार सुद्धा दिसणार नाही, असेही ना. पाटील यांनी सांगितले.