जळगाव : अयोध्येतील राम मंदिरावरुन खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. राऊतांच्या या वक्तव्यानंतर राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. देवेंद्र फडणवीसांनंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर अतिशय खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
काय म्हणालेय गुलाबराव पाटील ?
“संजय राऊतांसाठी राम या शब्दाचा उलटा शब्द वापरायला हवा”, अशा कडक शब्दांत गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा देखील होऊ लागली आहे.
जो भगवा हित की बात करेगा वही देश पे राज करेंगा
भाजप नेते आशिष देशमुख म्हणत आहेत तशीच परिस्थिती या देशामध्ये आहे. या देशात भगवा झेंडा घेऊन चालेल त्यांचेच राज्य येणार आहे. जो भगवा हित की बात करेगा वही देश पे राज करेंगा, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. “काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग लागेल”, असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलं आहे. या वक्तव्यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे