---Advertisement---
जळगाव : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यातून कोणीतरी राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त होत आहे. हा जळगाव जिल्ह्याचा बहुमान आहे. जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो, असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
गुलाबराव देवकर यांच्यावर सहकार विभागाचा ठपका
मी आजच अजित दादांना सांगितलं होतं की त्यांना पक्षात घेऊ नका ही तर सुरुवात आहे, अशी अजून पाच ते दहा प्रकरण माझ्याकडे आहेत. अनिमित्तचे आणि त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे दहा प्रकरणा लोकांकडे आहेत. सत्तामध्ये जाऊन त्यांनी ही प्रकरण दाबण्याकरताच प्रवेश केलेला आहे. कोरोना संपला तरी हा माणूस त्याच्या दवाखान्याचा 28 लाख रुपयांचे भाडं घेत आहे आणि या गोष्टीला हसन मुश्रीफ साहेबांनी स्थगिती दिली असं मला माहिती आहे, असा गंभीर आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर केला आहे.
संजय शिरसाट/ संजय गायकवाड वादात
लोकप्रतिनिधींनी सर्व गोष्टी संयमाने केल्या पाहिजेत, असे माझे मत आहे. आपल्याकडे सर्व समाजाचे लक्ष असते. काय काय वेळेस ओघाने बोलताना सुद्धा माणसाकडून चूक होते. वागताना चूक होते, ती लोक समजून घेतात. ज्या चुका नजरेच्या समोर येतात. त्या समाजाला सुद्धा पटत नाहीत. आमच्यासारख्या सुद्धा या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.