तरुण भारत लाईव्ह
Pariksha Pe Charcha जेव्हा मन भरकटते, काय करावे, सुचत नाही आणि काय करावे ते सांगणारी योग्य व्यक्तीही भेटत नाही, अशी वेळ ही कसोटीची असते. या समस्येतून मार्ग काढणे म्हणजे परीक्षा असते. त्यातच अलिकडे मोबाईल नावाच्या नव्या वेडाने विद्याथ्र्यांना अक्षरशः झपाटले आहे. Pariksha Pe Charcha आजकाल मुले दिवसातील बराचसा वेळ मोबाईलवर रेंगाळण्यातच घालवितात आणि आपली अभ्यासाची ऊर्जा मनोरंजनाच्या व्यापात गुरफटवून घेतात. या अनुत्पादक व्यापातून मुलांना बाहेर कसे काढावे, हा आजच्या पालकवर्गापुढील सर्वात मोठा प्रश्न आहे आणि समाजमाध्यमांचा वापर जसजसा विस्तारत जाईल, तसतशी ही चिंता वाढतच जाणार आहे. Pariksha Pe Charcha येत्या काही वर्षांत समाजमाध्यमे हाच माध्यमविश्वाचा मुख्य स्तंभ राहतील, अशी चिन्हे असली तरी समाजमाध्यमांच्या विश्वासार्हतेवर आज तरी प्रश्नचिन्हच आहे. गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांनी बातम्यांच्या विश्वात काहीसे गढूळ वातावरण तयार केले. Pariksha Pe Charcha समाजमाध्यमांचा उदय होण्याआधी मुद्रित किंवा दृक्श्राव्य स्वरूपातील जी माध्यमे अस्तित्वात होती, त्यांना विश्वासार्हता जपण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सत्याधारित वृत्तांकनाचे स्वयंप्रेरित बंधन होते.
Pariksha Pe Charcha त्यामुळे कोणतीही बातमी, घटना किंवा कोणत्याही घटनेचा मागोवा घेताना त्याची सत्यता पडताळणे, त्यावर जबाबदारीने भाष्य करणे आणि अंतिमतः समाजास नेमके वास्तव स्पष्ट करणारे काही देणे ही त्या माध्यमांची जबाबदारी मानली जात होती. आता समाजमाध्यमे आल्यानंतर प्रत्येकाच्या हाती आलेल्या मोबाईलमुळे प्रत्येक जण बातमीदारी करू लागला आणि हाती आले ते पुढे ढकलले, अशा स्वरूपाच्या वृत्तप्रसाराचा सुळसुळाट सुरू झाला. Pariksha Pe Charcha अशा, सर्वांत आधी माहिती पोहोचविण्याच्या नशेत बातमीची शहानिशा वगैरे करण्याची सवय संपली आणि साहजिकच सत्य-असत्य पडताळून पाहण्याची समाजाची सवयही संपत चालली. अशा माध्यमांमध्ये गुरफटून जाण्याने भावी पिढीचे भविष्य प्रश्नचिन्हांकित होण्याची भीती असल्याने, मुलांनी मर्यादित आणि ज्ञानसंकलनापुरताच या माध्यमाचा योग्य वापर करावा, हे सांगण्याचा हक्क खुद्द देशाच्या पंतप्रधानांनीच बजावला, हे योग्यच झाले. Pariksha Pe Charcha एका अर्थाने, पंतप्रधानांच्या पाठशाळेत खुद्द नरेंद्र मोदी यांनीच जीवनाच्या परीक्षेस सामोरे जाण्याचा आत्मविश्वास रुजविण्याचा गुरुमंत्र मुलांना दिला. देशाच्या भावी पिढीला आपुलकीने आणि विश्वासाने मार्गदर्शन करून शालेय जीवनातील सर्वांत कठीण मानल्या जाणा-या कसोटीस सामोरे जाण्याचा विश्वास रुजविणारा Pariksha Pe Charcha जगाच्या पाठीवरील पहिला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव राजकारणापलीकडच्या इतिहासात निश्चितच नोंदविले जाणार आहे.
Pariksha Pe Charcha मोबाईल वेडाचे दुष्परिणाम समजावून विद्यार्थी पिढीस त्याच्या उपयुक्ततेपुरत्या वापराचे महत्त्व समजावण्याचा पंतप्रधानांचा हा पहिला प्रयत्न नाही. गेल्या वर्षीदेखील ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात त्यांनी या समस्येवर विवेचक मंथन केले होते. अनेकदा मुले वर्गात असूनही त्यांचे ध्यान मात्र अन्यत्र कोठे भरकटलेले असते. शरीराला कोठेही दरवाजे नसतात, खिडक्या नसतात. मन दुसरीकडे कोठे असेल, तर कानदेखील काम करेनासे होतात, कोणतीच गोष्ट आठवणीत साठवली जात नाही. त्यामुळे, माध्यम ही समस्या नाही, तर मन ही समस्या आहे. Pariksha Pe Charcha मन जेव्हा माध्यमात बुडालेले असते, तेव्हा तो माध्यमाचा दोष नसतो. याच परिस्थितीचा फायदा घेऊन माध्यमात बुडालेल्या मनांनी शोधक वृत्ती जागी ठेवली, तर त्यातून विधायक मार्ग सापडू शकतो, असे पंतप्रधानांनी गेल्या वर्षीच्या चर्चेतील एका उत्तरात म्हटले होते. काळाबरोबर बदल हा अपरिहार्य असतो. किंबहुना बदल हीच काळासोबत घडणारी एक शाश्वत गोष्ट असल्याने, काळासोबत माध्यमे बदलणे साहजिकही आहे. फार पूर्वी, जेव्हा गुरुकुल पद्धत होती, त्यानंतरच्या बदललेल्या काळात जेव्हा छपाईचे तंत्र विकसित झाले नव्हते, तेव्हा धूळपाटी आणि पाटी-पेन्सिलीचा वापर व्हायचा आणि पाठांतर हाच विद्यासंपादनाचा हमखास मार्ग होता. Pariksha Pe Charcha अनेक पिढ्यांनी केवळ श्रवणशक्तीच्या जोरावर शिक्षणाद्वारे ज्ञान संपादन केल्यानंतर पुढे छपाईचे तंत्र विकसित झाले आणि त्यानुसार शिक्षण व ज्ञानार्जनाचे तंत्र बदलून काळानुरूप नव्या सुविधांचा वापर शिक्षणक्षेत्रात सुरू झाला.
आता मोबाईल, इंटरनेटसारखी अत्याधुनिक ज्ञानसाधने हाती आली असली तरी त्याचा वापर ज्ञानार्जनासाठीच व्हावा, याचा बोध मात्र अजूनही बालवयातील पिढीला मिळालेला नाही. पंतप्रधानांनी ‘परीक्षा पे चर्चा’ करताना याच त्रुटीवर बोट ठेवल्याने, नव्या तंत्राचा शिक्षणाच्या विकासासाठी कसा वापर करता येईल, याची गरज अधोरेखित झाली आहे आणि त्यानुसार शिक्षणपद्धतीच्या तंत्राच्या विकासाचा विचार करणे गरजेचे झाले आहे. Pariksha Pe Charcha आज डिजिटल उपकरणांच्या माध्यमातून अनेक गोष्टी सहजपणे उपलब्ध होत आहेत. मात्र, या उपकरणांचा संधी म्हणून वापर करण्याची क्षमता विकसित करण्याची गरज आहे. जगभरातील जे ज्ञान या माध्यमाद्वारे उपलब्ध आहे, ते संपादित करण्याकरिता या माध्यमाचा योग्य वापर व त्यासाठीचे मार्गदर्शन ही विद्यार्थी विश्वाची गरज ओळखून पंतप्रधानांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना दिशा दाखविली. Pariksha Pe Charcha नव्या शिक्षण धोरणाने नव्या शतकाच्या गरजा ओळखल्या आहेत. त्यानुसार धोरणाची आखणी करण्याचे केंद्र सरकारने ठरविले. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन त्यांच्या आवडीचे व भवितव्य घडविण्याचा आत्मविश्वास रुजविणारे शिक्षण घेण्याच्या संधी आता नाकारल्या जाणार नाहीत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने विद्याथ्र्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना तशी मुभा देण्याचे ठरविले आहे.
पाच वर्षांपूर्वी, १८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी पंतप्रधानांनी या उपक्रमातून पहिल्यांदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि एका वेगळ्या मोहिमेने आकार घेतला. विद्याथ्र्यांच्या मनात अनेक शंका असतात. Pariksha Pe Charcha कधी कधी त्यांचे निरसन करण्यात पालक अपुरे पडतात आणि शिक्षकांशी पुरेसा संवाद होत नाही. ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमातून विद्याथ्र्यांनी उपस्थित केलेल्या शंका केवळ एका विद्यार्थ्या चे शंकानिरसन करण्यापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. याच शंकांचे मोहोळ अनेकांच्या मनात दाटलेले असते. मोदी यांच्या उत्तरांतून केवळ शंकानिरसन नव्हे, तर मार्गदर्शनही झाले. म्हणून हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित राहिला नाही. Pariksha Pe Charcha तो समाजासाठी उपयुक्त ठरला. पालक, शिक्षक, समाज आणि विद्यार्थ्यांच्या रूपाने भावी पिढीस दिशा देणा-या या उपक्रमाने जगाच्या इतिहासावर आपली वेगळेपणाची नवी मोहोर उमटविली आहे. गेल्या पाच वर्षांत या उपक्रमाने अमाप यश मिळविले. Pariksha Pe Charcha आता या उपक्रमात सहभागासाठी कोणास सक्ती करावी लागत नाही, मुलांचा नावनोंदणीचा उत्साह हा त्याचा पुरावा ठरला आहे. पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी सहसा मुलांना लाभत नाही.
या उपक्रमाने काही भाग्यवंतांना या संधीची दारे खुली झाली आणि परीक्षा हे संकट नव्हे, तर उत्सव आहे, असा विश्वासही मुलांच्या मनात रुजण्यास मदत झाली. परिणामांची भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जाण्याचा उत्साह मुलांच्या मनात रुजविणे ही शिक्षणक्षेत्राची गरजही आहे. Pariksha Pe Charcha स्वतः पंतप्रधानांनी ती ओळखली आणि त्यामध्ये स्वतःस सहभागी करून घेतले, ही देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. अशा उपक्रमांचे यशापयश मोजण्यासाठी प्रचलित विचारांची मोजपट्टी पुरेशी ठरणार नाही. स्वच्छता ही एक सवय आहे, तो एक संस्कारही आहे. Pariksha Pe Charcha पण खुद्द पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून त्या संस्काराची साद समाजाला घातली, तेव्हा स्वच्छता ही देशाची चळवळ झाली. आज त्याची फळे दिसू लागली आहेत. कदाचित संपूर्ण यश संपादन करण्यासाठी काही काळ जावा लागेल, पण संस्कार रुजविण्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधानांनी देशाला दिलेली दिशा उल्लेखनीय ठरली आहे. Pariksha Pe Charcha विद्यार्थ्यांशी संवाद साधून परीक्षेच्या आव्हानास तोंड देण्याचा आत्मविश्वास रुजविण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांचे परिणामही असेच काही वर्षांनंतर दिसू लागतील, तेव्हा त्या यशाने आजच्या छिद्रान्वेषींचे डोळे दिपून जातील, यात शंका नाही.