---Advertisement---

पाचोऱ्यात २२ लाखांचा गुटखा जप्त, दोन आरोपींना अटक

---Advertisement---

पाचोरा : पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरखेडी नाका भागात २२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. नाकाबंदी दरम्यान रात्री गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई करीत २२ लाखांचा गुटखा जप्त केला. आठ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त केले. दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दोघांची जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली. मंगळवारी (१ एप्रिल) ही कारवाई करण्यात आली. वरखेडी नाका भागात पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, हवालदार राहुल काशिनाथ शिंपी, हवालदार समीर बापूराव पाटील, कॉन्स्टेबल सुनील आनंदा पाटील हे रात्री १ ते पहाटे चारच्या दरम्यान नाकाबंदी करीत होते.

या वेळी जामनेरहून पाचोऱ्याकडे एक वाहन येताना दिसले. या वाहनावर पोलिसांना संशय आला. त्यास थांबण्याचा इशारा केला. वाहनावरील चालक हा त्याचे वाहन पळवून नेत असताना त्यास थांबवून नाव, गाव विचारले. त्याने त्याचे नाव दत्तू लालदास बैरागी (२१, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगाव) असे सांगितले. चालकास वाहनात (एमएच-५२/००३४) काय माल आहे, याबाबत विचारणा करता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांना या गाडीचा संशय आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली. त्यात २२ लाख रुपये किमतीचे गुटख्याचे पोते आढळले. हे वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

याबाबत पाचोरा पोलिसात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन चालक दत्तू बैरागी (३१, रा. सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगाव) व मालक सनी टेकचंद पंजाबी (३५, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) यांना पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दोन्ही आरोपींची जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली.

ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक पवार, साहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश विलासराव भदाणे, पोलीसा उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार राहुल शिंपी, पोहेकॉ समीर बापूराव पाटील, कॉन्स्टेबल सुनील आनंदा पाटील आदींच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment