चिंताजनक! H3N2 नं बदललं रूप, अचानक रुग्णही वाढले

नवी दिल्ली : देशभरात इन्फ्लूएंझा ए सब टाईप H3N2 च्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांमध्ये विषाणूच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय आणि अनपेक्षित बदल झाल्याची माहिती दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील आरोग्य तज्ज्ञांनी दिली. सामान्यत: आपण इन्फ्लूएन्झारजे नंबर १ व्हायरच्या रुपात पाहतो. यावेळी इन्फ्लूएन्झा ए विशाण सब टाईप H3N2 नं श्वसन मार्गाचे अनेक संर्सग निर्माण केले आहेत, अशी प्रतिक्रिया सर गंगाराम रुग्मालयाचे सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. धीरेन गुप्ता यांनी दिली.

H3N2 विषाणूमुळे वैद्यकीय समस्या उद्भवत आहेत, प्रामुख्यानं फुफ्फुसांच्या संसर्गाचं कारण ठरत आहे. टाईप बी इन्फ्लुएंझानं एआरडीएसच्या रुपात फुफ्फुसाच्या अधिक गंभीर समस्या निर्माण केल्या आहेत. गंभीर निमोनियाला व्हेंटिलेशनची आवश्यकता असते. एडनोव्हायरस हा एक असा विषाणू आहे जो आणखी एका गंभीर आजाराला कारणीभूत ठरत आहे, असं डॉ. गुप्ता म्हणाले. गेल्या २ महिन्यांत, एडिनोव्हायरसमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागत आहे. डीएनए विषाणू मुख्यत्वे वरील श्वसन प्रणालीवर परिणाम करतात आणि डोळ्यांच्याही समस्या निर्माण करतात. याचा प्रसास करोनाप्रमाणेच होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

६० उपप्रकार
एडेनोव्हायरस एक डीएनए विषाणू आहे, ६० पेक्षा जास्त उपप्रकारांसह, गंभीर आजारांना सेरोटाईप ७, १४, सेरोटाईप १५,२१,१४ शी संबंधित आहे. प्रामुख्याने वरच्या श्वसनमार्गावर आणि डोळ्यांवर याचा परिणाम होतो. इम्युनोकॉम्प्रोमाइज्डमध्ये हे न्यूमोनियाचे कारणही ठरू शकते. विशेष म्हणजे तो कोरोनासारखाच वेगानं पसरतो. पूर्वी असं वाटलं होतं की हा विषाणू प्रामुख्यानं दोन वर्षांपेक्षा कमी काळासाठी प्रभावित करतो, परंतु या वर्षी त्याचं रुप निराळं होतं, सिडोफोव्हिरचा उपयोग इम्युनोकॉम्प्रोमाइज्डमध्ये प्रोगरेसिव्ह आजारांत केला जाऊ शकतो, असं ते म्हणाले.