एरंडोल : पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याकारणावरून व माहेरून पाच लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात एरंडोल पोलिसांत ४९८अ/प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रिंगणगाव येथील माहेरवाशीनी वैशाली आबा मराठे व पती आबा भास्कर मराठे यांना एक चार वर्षाचा मुलगा असून वैशालीचा पती आबा मराठे हे नाशिक येथे खाजगी रुग्णालयात नोकरीला आहे. दरम्यान, सदर पीडितेच्या वरील कारणावरून पती आबा भास्कर मराठे यांच्यासह चार जणांनी वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला.
याप्रकरणी पीडित महिलेनं एरंडोल पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पती आबा भास्कर मराठे यांच्यासह चार जणांविरोधात ४९८अ/प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील व दत्ता ठाकरे करीत आहेत.