हार्दिक पांड्याच नव्हे, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूंनाही सहन करावं लागलं घटस्फोटाचं दुःख

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि नताशा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. हार्दिकने पोस्ट करत नताशा हीच्यासोबत घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. ४ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आपण मिळून आपल्या मुलाचा सांभाळ करू असं त्यांनी सांगितलं. मात्र, हार्दिक पांड्याच नव्हे तर आधीही असे काही क्रिकेटपटू होते ज्यांचा घटस्फोट झाला असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

शिखर धवन
एकेकाळी रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार असलेल्या शिखर धवनला घटस्फोटाचे दुःख सहन करावे लागले आहे. 2009 मध्ये मेलबर्नमध्ये आयशा मुखर्जीसोबत त्याची एंगेजमेंट झाली आणि त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांना एक मुलगाही आहे. दोघांचा लग्न संसार 11 वर्षे टिकला. मात्र, दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि मानसिक छळाच्या कारणावरून 2023 मध्ये धवनने आयशाला घटस्फोट दिला. आयशा आणि तिचा मुलगा झोरावर हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक असून ते तिथेच राहतात. दिल्ली कोर्ट 2023 ने आपल्या निर्णयात म्हटले होते की, आयशाने धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडले आणि मानसिक त्रास दिला.

दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रिण निकिता बंजारासोबत 2007 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी लग्न केले. मात्र, त्यांचे लग्न केवळ 5 वर्षे टिकू शकले. 2012 मध्ये, कार्तिकची पत्नी विवाहित असताना त्याचा सहकारी क्रिकेटर मुरली विजयसोबत रिलेशनशिपमध्ये आली. हे जाणून कार्तिकला धक्काच बसला. यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. नंतर कार्तिकने 2015 मध्ये स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी लग्न केले.

मोहम्मद शमी
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2014 मध्ये हसीन जहाँशी लग्न केले. दोघांची पहिली भेट आयपीएलदरम्यान झाली होती. हसीन जहाँ त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर होती. लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हसीन जहाँने 2018 मध्ये शमीवर लग्नाबाहेर इतर मुलींसोबत अफेअर आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. तेव्हापासून दोघेही वेगळे राहतात. मात्र, दोघांचेही प्रकरण न्यायालयात अडकले आहे. शमीला एक मुलगीही आहे, जी हसीन जहाँसोबत राहते. नुकतेच त्याने आपल्या मुलीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

मोहम्मद अझरुद्दीन
भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या मोहम्मद अझरुद्दीनने एकदा नव्हे तर दोनदा घटस्फोट घेतला आहे. त्यांनी 1996 मध्ये पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला आणि बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. काही वर्षांनंतर, त्याने संगीता बिजलानीशी घटस्फोट घेतला आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाशी लग्न केले.

विनोद कांबळी
भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीने 1998 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण नोएला लुईसशी लग्न केले. लग्नादरम्यान पत्नीवर अत्याचार आणि छळ केल्याचा आरोप त्याच्यावर होता. यानंतर त्याने पत्नीपासून घटस्फोट घेतला.

जवागल श्रीनाथ
जवागल श्रीनाथ हा भारताचा वेगवान गोलंदाज आहे. सध्या तो आयसीसीसाठी सामनाधिकारी म्हणून काम करतो. 1999 मध्ये त्यांनी ज्योस्नाशी लग्न केले, पण 2007 मध्ये 8 वर्षांनी घटस्फोट झाला. अवघ्या वर्षभरानंतर त्यांनी पत्रकार माधवी पत्रावलीशी लग्न केले.