अखेर हार्दिक-नताशाचा घटस्फोट; मुलगा अगस्त्यबाबत दोघांनी घेतला मोठा निर्णय

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात मागील काही दिवसापासून घटस्फोट झाल्याची चर्चा होती. मात्र दोघांकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. अखेर हार्दिकने चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचं ठरवलंय. याबात हार्दिक पंड्याने पोस्ट शेअर करत घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता त्यांचा मुलगा अगस्त्य कोणाकडे राहणार? असा प्रश्न उपस्थित राहत होता. अखेर याबाबतही दोघांनी मोठा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी अनंत अंबानीचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला हार्दिक पंड्याने हजेरी लावली होती. त्यावेळी तो एकटाच वावरताना दिसला. यापूर्वी झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळवला. त्यावेळीही नताशा कुठंय? असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. बुधवारी ती आपल्या आई वडिलांच्या घरी परतली. त्यानंतर गुरुवारी हार्दिकने घटस्फोट घेतल्याची बातमी दिली.

हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, ‘ ४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे नातं टिकविण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र आम्हाला आता हाच निर्णय घेणं योग्य वाटतंय. हा निर्णय घेणं खूप कठीण होतं.’

मुलगा अगस्त्य कोणाकडे राहणार?
दोघांना अगस्त्य नावाचा एक मुलगा आहे. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर अगत्य कोणाकडे राहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. हार्दिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘ अगस्त्य आमच्या दोघांच्या आयुष्यातील एक भाग असेल. आम्ही दोघे त्याचं पालकत्व सांभाळणार आहोत. यासह आम्ही त्याला शक्य तितका आनंद देण्याचा प्रयत्न करू. आम्ही अशी आशा करतो की, आम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल आणि तुम्ही आम्हाला समजून घ्याल.’ हार्दिक पंड्या आणि नताशाने २०२० मध्ये लग्न केलं होतं त्यावेळी लॉकडाऊन सुरू होता. त्यानंतर अगत्य झाल्यानंतर ते पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले होते.