हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार बाहेर… मुंबई इंडियन्सवर कोसळले मोठे संकट ?

नुकताच मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनलेल्या टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे. असे म्हटले जात आहे की, हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मधून देखील बाहेर जाऊ शकतो, कारण त्याच्या घोट्याला झालेली दुखापत खूप गंभीर आहे. आणि त्याला वेळेत तंदुरुस्त होणे कठीण आहे. असे झाल्यास केवळ मुंबई इंडियन्ससाठीच नाही तर टीम इंडियासाठीही हा मोठा धक्का असेल.

दुखापतीमुळे हार्दिक पांड्या दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेशिवाय तो आयपीएल २०२४ पासूनही दूर असू शकतो. याचा अर्थ असा की हार्दिकला परत येण्यासाठी 2-3 महिने लागू शकतात, जर असे झाले तर तो 2024 च्या T20 वर्ल्ड कपपर्यंतच फिट असेल.

अफगाणिस्तान मालिकेपर्यंत हार्दिक पांड्या तंदुरुस्त नसल्याचंही पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र, हार्दिकच्या फिटनेसबाबत बीसीसीआय किंवा मुंबई इंडियन्सकडून अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट देण्यात आलेले नाही.

एकदिवसीय विश्वचषकात झाली दुखापत 

तुम्हाला सांगतो की, हार्दिक पंड्या 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध चेंडू थांबवताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती, त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. हार्दिकला विश्वचषकाच्या मध्यावर संघ सोडावा लागला, तेव्हापासून तो रिकव्हरी मोडमध्ये आहे. यापूर्वी असे मानले जात होते की हार्दिक आयपीएलपर्यंत पुनरागमन करू शकतो, परंतु आता ही आशाही कठीण दिसते आहे.

हार्दिक पांड्याला नुकतेच मुंबई इंडियन्सने कर्णधार बनवले आहे. आयपीएल 2024 च्या आधी झालेल्या लिलावात आणि रिटेन्शनमध्ये, हार्दिकने गुजरात टायटन्स सोडला आणि मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. मुंबईने आता हार्दिकला आपला कर्णधार बनवले आहे, तर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जर हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये खेळला नाही, तर संघाचे कर्णधार कोण, रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवले जाईल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.