---Advertisement---

घरातून बाहेर पडला अन् पाच दिवसांनी आढळला मृतदेह

---Advertisement---

---Advertisement---

जळगाव : पाच दिवसांपासून घरातून बाहेर पडलेला २९ वर्षीय तरुण बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह नशिराबाद शिवारातील विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या शेताच्या बांधावर गुरुवारी आढळून आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांना कुजलेला मृतदेह सापडल्याने त्यांनी याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. रामू हशा वास्कले (वय २९, रा. नांदिया, ता. भगवानपूर, जि. खरगौन, मध्यप्रदेश, ह. मु. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

कुसुंबा गावात एका शेतकऱ्याच्या शेतात सालदार म्हणून काम करत होता. शनिवारी (२६ जुलै )रोजी तो पत्नीला “मी गावात चप्पल आणायला जातो” असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण तो कुठेही मिळून आला नाही.

गुरुवारी (३१ जुलै ) रोजी सकाळी नशिराबाद शिवारातील विमानतळाच्या मागे असलेल्या आत्माराम राजाराम पाटील यांच्या शेताच्या बांधावर रामू वास्कले याचा कुजलेला मृतदेह आढळून आला. ही वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, हा मृतदेह पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रामू वास्कले याचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---