आई-वडिलांसाठी पाणी आणायला गेला मात्र घडलं विपरीत, वडील धावले पण..

जळगाव : पाचोरा तालुकयात एक धक्कदायक घटना घडली आहे. आई-वडिलांसाठी पिण्यासाठी पाणी आणायला गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. समाधान उर्फ बाळु (वय २३) असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली.

मिळलेल्या माहितीनुसार, जामनेर रोडवरील आर्वे फाट्याजवळ अंतुर्ली येथील वना मोतीराम पाटील हे २० वर्षांपासून डॉ. संघवी यांच्या शेतात मोलमजूरी करून उदरनिर्वाह करतात. नेहमी प्रमाणे शेतात काम करत असतांना वना मोतीराम पाटील, समाधान उर्फ बाळु वना पाटील, अमोल वना पाटील, आई प्रतिभा वना पाटील (रा. अंतुर्ली) हा परिवार शेतात काम होते. या दरम्‍यान समाधान उर्फ बाळु (वय २३) यास शेजारील बोहरी यांच्या शेतातील विहीरीवरुन पिण्यासाठी पाणी घेऊन येण्याचे सांगितले.

समाधान हा शेतातील विहीरीवर पाणी आणायला गेला. पिण्यासाठी पाणी काढत असताना त्याचा विहिरित तोल जाऊन तो विहिरित पडला. बाजूला काम करत असलेले वडील व भाऊ यांना विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी तात्काळ विहीरीकडे धाव घेत पाहिले असता समाधान विहिरित पडला आहे. समाधानला वाचवण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले‌. दोर विहिरित टाकला परंतु समाधानला दोर पकडण्यात अपयश आले. समाधान हा मृत्युशी झुंज देत होता. परंतु वडील देखील काहीच करू शकले नाही. आजूबाजूला कोणीच नसल्याने समाधान बुड़ुन विहिरीत तळासी गेला.