तरुण भारत लाईव्ह ।०१ मार्च २०२३। ग्रीस मधून अपघाताची बातमी समोर येतेय. प्रवासी ट्रेन आणि मालगाडीची समोरासमोर जोरदार धडक होऊन काही जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री थेसालोनिकीकडे जाणारी प्रवासी ट्रेन आणि एका मालगाडीची जोरदार धडक झाली. हि धडक इतकी भीषण होती की पहिल्या दोन डब्ब्यांचा पूर्णपणे चक्काचूर झाला. दोन्ही ट्रेनची एकमेकांना जोरदार धडक झाल्यानंतर पहिल्या दोन ते तीन डब्ब्यांना आग लागली.
घडलेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ८५ जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले २५० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.