---Advertisement---

परीक्षेत कमी गुण; मुख्याधापक पिताच उठला लेकीच्या जीवावर, मारले जीव जाईपर्यंत !

सांगली : परीक्षेत कमी गुण मिळाले, या रागातून मुख्याध्यापक असलेल्या पित्याने लेकीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेली लेक मृत्युमुखी पडली. ही धक्कादायक घटना सांगलीमध्ये समोर आली आहे. साधना भोसले (१७) असे मृत मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली आहे. साधनाचे वडील धोंडीराम भोसले हे नेलकरंजी येथे एका खाजगी शिक्षण संस्थेत मुख्यध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर साधना ही विज्ञान शाखेत शिकत होती. तिला १२वी चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे वडील धोंडीराम भोसले प्रचंड संतापले आणि तिला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली.

या मारहाणीत गंभीर जखमी झालेली साधना शुक्रवारी (२० जून) रोजी रात्री मृत्युमुखी पडली. या प्रकरणी साधनाची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

दहावीत होते ९२ टक्के

साधना हिला दहावीत ९२ टक्के गुण मिळाले होते. मात्र, नीटच्या चाचणी परीक्षेत ती चांगले गुण मिळवू शकली नाही. याचा राग वडील धोंडीराम भोसले यांना अनावर झाला. या रागातून त्यांनी तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीतून जिने जीव गमावला, अशी फिर्याद आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment