कच्च्या कैऱ्या खाल्ल्याने होतात आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहितेय का?

तरुण भारत लाईव्ह ।०५ मार्च २०२३। मार्च महिन्याला सुरवात झाली आहे. त्यामुळे आता कच्ची कैरी बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहे. कैरीवर तिखट मीठ लावून खायला जवळपास प्रत्येकालाच आवडत असतं. मात्र आंबट कच्च्या कैऱ्या खाल्ल्याने अनेक फायदे होतात हे तुम्हाला माहितेय काय? चला तर जाणून घेऊया आंबट कच्च्या कैऱ्या खाल्ल्याने काय होतात फायदे.

काय आहेत फायदे?
कैरी खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कैरीमध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी वाढते. त्यामुळे तुम्हाला जर शरीरातील इम्युनिटी वाढवायची असेल तर तुम्ही कैरी खाऊ शकता. कैरीमध्ये कॅरोटीनॉईड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

कैरीमध्ये व्हिटॅमिन बी आणि असते. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीने होते. बद्धकोष्ठता, अपचन, शरीरात वाढणारी उष्णता इत्यादी समस्या तुम्हाला उन्हाळ्यात जाणवल्यास तुम्ही कैरी खाऊ शकता. तसेच कैरीचं पन्ह देखील तुम्ही उन्हाळ्यात पिऊ शकता. कैरीचं पन्ह उन्हाळ्यात प्यायल्याने शरीरातील उष्णतेचे परिणाम कमी होते.