वराडसीम येथे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे आरोग्य तपासणी शिबिर

---Advertisement---

 

भुसावळ : महाराष्ट्र लेव पाटीदार महासंघ व झुंजार लेवा ग्रुप वराडसीम यांच्या वतीने नुकतेच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 369 लोकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली.

शिबिरामध्ये रक्तदाब, बीपी, डायबिटीस, शुगर, कार्डिओग्राम, एसीजीची तपासणी सुद्धा मोफत करण्यात आली. आरोग्य शिबिरासाठी हृदयम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व नेत्रम हॉस्पिटलभुसावळ येथील डॉ . मेश्राम, डॉ. मनिष रगडे यांनी रुग्णांची तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केले.

शिबिराच्या सुरुवातीला नेत्ररोग तज्ञ डॉ मेश्राम यांच्या हस्ते मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सर्व मान्यवर डॉक्टर यांचे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ वराडसिम गावकरी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

मोफत आरोग्य शिबिरासाठी महासंघाचे खान्देश विभाग संघटक विनीत पाटील (हबर्डिकर) महासंघाचे पदाधिकारी धीरज बऱ्हाटे महासंघाचे वरडशिम गाव प्रमुख पराग भारंबे ,अनिकेत ढाके,सागर काळे, त्रृषल खाचणे, ज्ञानराज काळे, दीपक वाणी, गौरव पाचपांडे, जयेश भारंबे, झुंजार लेवा ग्रुप व महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ वराडसिमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---