मोसंबीचा आरोग्यवर्धक ज्यूस; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह ।९ मार्च २०२३। शरीर निरोगी राहण्यासाठी आहारामध्ये फळांचा अधिक प्रमाणात समावेश करावा. तुम्हाला फळे खायला आवडत नसतील घरच्या घरी त्यापासून ज्युस देखील तयार करू शकता. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन ‘ए’, व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘सी’ ची मात्रा भरपूर असते. जर तुम्हाला मोसंबी खायला आवडत नसेल तर तुम्ही मोसंबीचा ज्यूस सुद्धा करू शकता मोसंबीचा ज्यूस घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
स्वीट लाइम, शेंगदाणा तेल, मोहरीच्या बिया, जिऱ्याच्या बिया, हिंग, हिरव्या मिरच्या,लसूण,आवश्यकतेनुसार मीठ, पाणी

कृती
सर्वप्रथम एक मोसंबी, तेल, मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेले लसूण, ५०० एमएल पाणी आणि चवीनुसार मीठ. एका बाउलमध्ये मोसंबी पिळून त्याचा रस काढा. त्यामध्ये मीठ आणि पाणी मिक्स करावे. हे पाणी चमच्याच्या मदतीने एकजीव करावे. आता एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हिरव्या मिरच्या आणि चिरलेले लसूण फ्राय करून घ्या. ३० सेकंद सर्व सामग्री ढवळत राहावी.यानंतर ही फोडणी मोसंबीच्या रसामध्ये वरून सोडावी. तयार आहे मोसंबीचा रस.