हेल्दी व्हेजिटेबल दलिया रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ३० एप्रिल २०२३। व्हेजिटेबल दलिया’ सर्वात साध्या पण तितक्यात पौष्टिक आणि आरोग्यदायी डिश आहे. यामध्ये लोह आणि फायबरची उच्च मात्रा आढळून येते. व्हेजिटेबल दलियामध्ये कार्ब्स मुबलक प्रमाणात असतात. व्हेजिटेबल दलिया घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
१ कप फुलकोबी, १कप गाजर, १ कप मटार, १ कप शिमला मिरची, १ कप टोमॅटो, १ कप कांदा, १ कप कोथिंबीरीची पाने, आवश्यकतेनुसार हळद, आवश्यकतेनुसार लाल मिरची, आवश्यकतेनुसार भाजलेले जिऱ्याच्या बिया, आवश्यकतेनुसार मीठ,  १ कप गव्हाचा तुकडा, २ चमचे तूप, १ चमचे लेमन ज्यूस

कृती 
सर्वप्रथम, कुकरमध्ये साजूक तूप घेऊन ते गरम करा. पुढे, गरम झालेल्या तूपात एक कप दलिया घाला. ३ ते ४ मिनिटे दलिया चांगलं भाजून घ्या. भाजलेल्या दलियामध्ये मीठ आणि पाणी घाला. १ वाटी दलियासाठी ३ कप पाणी हे प्रमाण वापरावे. पाणी चांगले उकळू लागताच कुकर बंद करुन दलियाला २ शिट्ट्या देऊन चांगले शिजवावे. एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन गरम करा. गरम तूपात कांदा टाकून चांगला परतून घ्या. आता कांद्यामध्ये फ्लॉवर, गाजर, वाटाणे आणि टोमॅटो टाकून गॅसच्या मोठ्या आचेवर सर्व सामग्री एकदम व्यवस्थित मिक्स करुन घ्या.

आता त्या सर्व भाज्यांमध्ये शिमला मिरची, हळद पावडर, लाल तिखट पावडर, भाजलेले जीरे आणि मीठ टाकून सर्व सामग्री चांगली परतून घ्या.  आता कुकरमधून दलिया बाहेर काढून भाज्यांमध्ये मिक्स करा. एक मिनिटे सर्व सामग्री चांगली शिजवून घ्या. स्वाद वाढवण्याठी शिजवलेल्या दलियामध्ये लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घाला. आणि सर्व्ह करा पौष्टिक व्हेजिटेबल दलिया!