Local Self-Government : सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून तारीख पे तारीख पे सुरु आहे आणि आता पुन्हा नवी तारीख मिळाली आहे. 28 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आजची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा लांबणीवर पडला आहे. सुप्रीम कोर्टातील आज (मंगळवारी) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ही सुनावणी २८ मार्च रोजी होणार आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे आजच्या सुनावणीवेळी गैरहजर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली गेल्याच म्हटलं जात आहे.