---Advertisement---

कोरोना झालेल्यांना हार्ट, ब्लड प्रेशरचा त्रास; एम्सचा धक्कादायक रिसर्च

---Advertisement---

नवी दिल्ली : कोरोनामध्ये ज्या लोकांना गंभीर संसर्ग झाला होता त्यांना नंतर खूप समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. एम्सच्या रिसर्चमध्ये याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. कोरोनानंतर अनेकांना हृदयसंबंधित समस्या असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. कोरोनानंतर ब्लड प्रेशरची समस्याही लोकांमध्ये अधिक दिसून आली आहे. त्यामुळे कोरोना झालेल्या लोकांनी वर्षातून एकदा तरी हार्ट आणि बीपी कंट्रोलमध्ये आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी चाचणी करावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

एम्सच्या फिजियोलॉजी विभागाचे डॉ. दिनू एस चंद्रन यांनी हा अभ्यास केला आहे. ते म्हणाले, “केवळ गंभीर संक्रमणच नाही तर कोरोनानंतर सौम्य रुग्णांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. विशेषतः जेव्हा ते बसल्यानंतर उठतात तेव्हा थकवा आणि हृदयाची धडधड वाढते. उपचाराशिवाय, रुग्णालयात न जाता बरे झालेल्या 56 सौम्य कोरोना रुग्णांवर एक अभ्यास केला गेला.”

डॉ. दिनू एस चंद्रन म्हणाले, “काही काळानंतर, आर्टरीमध्ये असलेला सेन्सर मेंदूला मेसेज पाठवतो आणि मेंदू हृदयाच्या मज्जातंतूला मेसेज पाठवतो आणि सिग्नल हृदयाला मिळतो आणि त्याचे व्यवस्थापन केले जाते. सौम्य कोरोनामध्ये केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की 8 ते 10 टक्के लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो की जेव्हा ते बसल्यानंतर उठतात तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यांना थकवा जाणवतो.”

एम्सच्या डॉक्टरांनी कोरोना मॉडरेड रुग्णांना सल्ला दिला आहे की, कोरोनामुळे हृदयाच्या आर्टरी सेन्सरमध्ये थोडी समस्या निर्माण झाली आहे. सेन्सर्स कार्यरत नसल्यामुळे, कोविडनंतर लोकांच्या ब्लड प्रेशर कमी होण्याची समस्या दिसून आली आहे. एम्समधील डॉक्टरांचा दावा आहे की कोरोनामुळे आर्टरी सेन्सरला त्रास होतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करता येत नाही हे सिद्ध करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment