तरुण भारत लाईव्ह । ३० मार्च २०२३। पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून एका ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रामदास दोरगे (वय ५ वर्ष ६ महिने) असं मृत मुलाचे नाव असून त्याच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ही घटना मंगळवारी रोजी घडली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील भांडगाव येथे पाण्याच्या टाकीत पडून एका ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अभय रामदास दोरगे (वय ५ वर्ष ६ महिने) असं मृत मुलाचे नाव आहे. रामदास दोरगे यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्यांना दोन मुले असून त्यांची दोघे मुलं अक्षय आणि अभय घरासमोर खेळत होती. रामदास दोरगे यांनी पोल्ट्री फार्मसाठी एक सिमेंटची पाच फूट खोल अशी पाण्याची टाकी बांधलेली आहे. अक्षय आणि अभय खेळता खेळता या पाण्याच्या टाकीकडे गेला. त्यातील लहान मुलगा अभय हा पाण्याच्या टाकीकडे गेला. यावेळी घरातील कोणतीच माणसे त्यांच्यासोबत नव्हती. पाण्याच्या टाकीकडे डोकवत असताना अचानक अभयचा तोल गेला. तोल गेल्याने तो पाण्याच्या टाकीत पाच फुटावर जोरात आपटला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
मुलगा पडल्याचे समजल्यावर दोरगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. अभय हा दोरगे यांचा छोटा मुलगा होता. सर्वात छोटा असल्याने तो सर्वांचा लाडका होता. त्याच्या अचानक जाण्याने दोरगे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.