तरुण भारत लाईव्ह ।१३ फेब्रुवारी २०२३। दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर येतेय. लिफ्ट मध्ये अडकून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मयत मुलाचे नाव अलोक असून तो हॉलंबी येथील रहिवासी आहे. याबाबत पोलीस तपास करत आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर दिल्लीतील ओद्योगीक क्षेत्रात काम करणाऱ्या सेक्टर पाच मध्ये हि घटना घडली. लिफ्टमध्ये फसून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.हा मुलगा कंपनीचा सामान वर नेत असताना लिफ्ट खराब होऊन लिफ्ट मध्ये तो अडकला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून या प्रकरणी तपास सुरू झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत कुलर बनविण्याचे काम सुरू आहे. येथे काही बालमजूर काम करतात. घटनेनंतर कंपनीचा मालक फरार झाला. पोलीस कंपनी मालकाचा शोध घेत आहेत. मृतकाचं नाव आलोक असं आहे. तो होलंबी येथील रहिवासी आहे. बालकाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी मालकाला अटक केव्हा होते. त्याच्यावर नेमकी पोलीस काय कारवाई करतात, हे पहाणं महत्वाच ठरेल.