तरुण भारत लाईव्ह ।०४ फेब्रुवारी २०२३। कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा गव्हाच्या पिठाच्या भांड्यात तोल जाऊन पडल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. कृष्णराज राजाराम यमगर वय ९ असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सूत्रानुसार, कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे तालुक्यात हि घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृष्णराज हा चिमुकला वॉकरमधून चालत खेळत होता. मात्र, चालता-चालता त्याचा गव्हाच्या पिठाच्या भांड्यात तोल गेला आणि तो त्यात पडला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले मात्र नाका तोंडात पीठ गेल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. हि माहिती कळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिसात नोंद झाल्याचे कळते.