तरुण भारत लाईव्ह ।२५ फेब्रुवारी २०२३। गुजरातमधून एक धक्कादायक घटना उघडीस आली आहे. घरामध्ये लग्नाची तयारी सुरु असतानाच वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून अचानक आनंदावर विरजण पडले. लग्न मडंपातून वराती ऐवजी नवरीची अंत्ययात्रा निघाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भावनगरमध्ये घरात लग्नाची तयारी सुरु होती सनई-चौघडे वाजत होते. नववधू आणि वर आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण जगत होते. सगळं काही प्रसन्नमय होतं. याच दरम्यान वधूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लग्नाआधी हेतलला चक्कर येत होते. मोकळा श्वास घ्यायला म्हणून हेतल गच्चीवर गेल्या आणि गच्चीवर बेशुद्ध पडल्या आणि घरातील लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
डॉक्टरांनी सांगितले की, हेतलला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे तिला वाचवता आले नाही. याचा परिणाम असा झाला की, ज्या घरात काही काळापूर्वी लग्नाच्या गाण्यांची धूम होती, त्या घरात मुलीच्या मृत्यूने शोककळा पसरली होती.