---Advertisement---

हृदयद्रावक! अंघोळीसाठी तलावात गेले पण परतलेच नाही….

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १ सप्टेंबर २०२३। बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातून एक एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाची राखी हातालाच असताना पोहायला गेलेल्या ५ भावांचा तलावात तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

सूत्रानुसार गावातील पाचही मुले रक्षाबंधन केल्यावर गावाशेजारी असलेल्या एका तलावात पोहायला गेली असल्यावर हि मुले चुकून खोल पाण्यात गेली आणि तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला. या परिसरातील गुरे चारणाऱ्या लोकांना मुलांचे कपडे दिसल्याने संशय आला यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर मुलांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शुभम कुमार, नीरज कुमार, धीरज कुमार, प्रिन्स कुमार, आणि अमित कुमार अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान तलावात मुले बुडाल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment