मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांत उष्णतेच्या लाटा तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तसेच नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा पुढील ४८ तासांत आणखी वाढणार असून, रविवारी आणि सोमवारी परिस्थिती आणखी भीषण होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.

महाराष्ट्रातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटा तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जळगावात काय आहे स्थिती?
गेल्या दोन दिवसात जळगावात रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली आहे. दोन दिवसात किमान तापमान ७ अंशानी घसरले असून, ८ मार्चपर्यंत पहाटेचा गारवा अधिक राहणार आहे. मात्र, होळीनंतर वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढणार असल्याचा ८ अंदाज वर्तवण्यात आला आहे.