चोपडा : तालुक्यात १४ रोजी रात्री १ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
केळी पिकांची नवीन लागवड केलेली रोपे वाहून गेली आहेत.शेतात गुढगाभर पाणी साचल्याने कापूस,मका यांच्यासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने त्यांचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने बांध बंधी फुटल्या आहेत.
वाहून जणाऱ्या पाण्यामुळे जमिनीचा वरचा सुपिक थर वाहून गेल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेहमीच आस्मानी सुलतानी संकटांचा सामना करीत असतो शेती साठी लागणारा खर्चात खूपच वाढ झाल्याने नफ्याचे प्रमाणात आधीच बरीच घट झाल्याने शेतकरी अडचणीत आहे.
या बिगर छप्पर चा शेती करणाऱ्या बळी राजाला या संकटात आधार देण्यासाठी शासनाने तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत तसेच नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी वडगाव बु।। चे माजी सरपंच तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य नामदेवराव पाटील,प्रा.संदीप पाटील यांच्यासह पंचकृषितील शेतकऱ्यांनी केली आहे.