---Advertisement---

‌‘पांझरा‌’सह अक्कलपाडा प्रकल्पातून विसर्ग, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

---Advertisement---

---Advertisement---

धुळे : जिल्ह्यात पांझरा नदी व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत पांझरा व निम्न पांझरा अक्कलपाडा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे 26 आणि 8 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे पांझरा, मालनगाव आणि जामखेडी या प्रकल्पांतून विसर्ग सुरू असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत वाढत असून, अक्कलपाडा प्रकल्पातून 5 हजार क्यूसेक विसर्ग केला जात आहे. त्यामुळे धुळे शहरातील कालिकामाता मंदिराजवळील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात पांझरा नदी प्रकल्प पाणलोट क्षेत्रासह अक्कलपाडा निम्न पांझरा प्रकल्प तसेच अन्य प्रकल्प पाणलोट क्षेत्रात सरासरी 37 मिलीमीअर पावसाची नोंद झाली आहे. प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या आवकेमुळे निम्न पांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून 5हजार क्युसेक विसर्ग करण्यात येत असून विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळे मनपा अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागामार्फत पांझरा नदी किनाऱ्यालगत नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कालिकामाता मंदिरजवळील पूल बंद करण्यात आला असल्याचे धुळे मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता व अक्कलपाडा प्रकल्प विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात 40.54 टक्के प्रकल्पीय साठा


जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेजमध्ये 21.64 टक्के साठा असून, बॅरेजचे सहा दरवाजे दीड मीटरने उघडून 22 हजार 916 क्यूसेक तसेच सारंगखेडा बॅरेजमध्ये 20.34 टक्के साठा असून, बॅरेजचे पाच दरवाजे दोन मीटरने उघडून 24 हजार 790 क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे. पांझरा, जामखेडी 100 टक्के, मालनगाव 99.91, कनोली 13.61, बुराई 36.17, करवंद 26.01, अनेर 29.41, सोनवद 9.05, अमरावती 55.86, अक्कलपाडा 84.21, वाडीशेवाडी 44.09 आणि मुकटी 59.18 असा 40.54 टक्के म्हणजेच 7.16 टीएमसी उपयुक्त जलसाठा आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तीन प्रकल्प ओसंडले!


नंदुरबार जिल्ह्यात रंगावली, दरा आणि देहली हे तीन प्रकल्प 100 टक्के भरले आहेत, तर प्रकाशा बॅरेजमध्ये 65.53 जलसाठा असून, बॅरेजचे तीन दरवाजे एक मीटरने उघडून 24 हजार 436 क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे. शिवण प्रकल्पात 55.40, नागन 82.01, कोरडी 31.66 असा सरासरी 73.85 टक्क्यांनुसार 4.18 टीएमसी उपयुक्त जलसाठा असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---