जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, २५वर्षीय तरुण वाहून गेला!

---Advertisement---

 

जळगाव : जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी, नदी-नाल्यांची पातळी झपाट्याने वाढली असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात २५ वर्षीय तरुण नाला ओलांडताना वाहून गेला, तर जामनेर तालुक्यात अनेक गुरे वाहून गेले असून, दोन गावांचा संपर्क तुटला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पाचोराच्या सातगाव (डोंगरी) परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. यामुळे सातगाव (डोंगरी) परिसरातील अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दोन गावांचा तुटला संपर्क

जामनेर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शेती पिकांसह घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून, अनेक गावात गुरे वाहून गेले आहे. तर दोन गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, याबाबत तात्कळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पुराच्या पाण्यात वाहून गेला तरुण


दुसरीकडे, मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील २५ वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरण मधुकर सावळे (वय 25) असे तरुणाचे नाव असून, तो घराकडे येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली. संबंधित विभागाकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---