जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज, जाणून घ्या कधी?

---Advertisement---

 

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, जिल्ह्यातील पावसाची मोठी तूट भरून निघाली आहे. अशात पुन्हा 3 सप्टेंबरपासून जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा हवामान विभागाकडून जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल अशी शक्यता वर्तविली होती. यंदा मात्र जिल्ह्यातील पावसाची स्थिती प्रत्येक महिनानिहाय बदलताना दिसत आहे. जून महिन्यात सरासरी तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात मात्र जिल्ह्यात सरासरीपेक्षा ११४ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ९२ टक्के पाऊस झाला असून, अजूनही पावसाची ८ टक्के एवढी तूट आहे. ऑगस्टच्या मध्यापर्यंत हीच तूट ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र, १५ ते १६ ऑगस्टपासून जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने, जिल्ह्यातील पावसाची मोठी तूट भरून निघाली आहे. यासह या पावसामुळे खरीप पिकांनाही जीवदान मिळाले आहे.

दमदार पावसाचा अंदाज

१ जून व जुलै महिन्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसला तरी पावसाळ्याती शेवटच्या दोन महिन्यांत पावसाची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यान तशी नोंदच झाली. दरम्यान, आगामी 3 सप्टेंबर महिन्यातदेखील जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

त्यात गेल्या पाच 3 वर्षामधील सप्टेंब महिन्यातील पावसाची स्थिती पाहिली तर सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद आ सप्टेंबर महिन्यात एकूण सरासरी १२३ मिमी इतकी आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक पाऊस गेल्या पाच वर्षांत झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---