जळगाव जिल्ह्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस, भाविकांचा होणार हिरमोड?

---Advertisement---

 

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून, आणखी दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे विसर्जनाआधी दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने, जळगाव शहरात आरास पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून, बुधवारी देखील जळगाव शहरात दमदार पावसाची हजेरी लागली. दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान जळगाव शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच सायंकाळी ५ वाजेनंतर रात्री उशिरापर्यंत पावसाचीही रिपरिप कायम होती. आधीच हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला होता, त्यानुसार जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्येही बुधवारी पावसाने हजेरी लावली. जळगाव शहरात दुपारी २ वाजता पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर दमदार पाऊस झाला. नवीपेठ, आकाशवाणी चौक, ख्वॉजामिया चौक परिसर, शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर, छत्रपती शिवाजीनगर महाराज क्रीडा संकुल परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. तसेच उपनगरातील काही गणेश मंडळाच्या मंडपात पावसाचे शिरले होते.

अजून दोन दिवस यलो अलर्ट

आगामी दोन दिवस म्हणजेच ४ व ५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे विसर्जनाआधी दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने, जळगाव शहरात आरास पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. विसर्जनाआधीच्या शेवटच्या दोन दिवसात गणेश मंडळांच्या आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते, मात्र पावसाच्या शक्यतेमुळे गणेश मंडळांसमोर होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---